मी मुलगी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे |
सकाळची वेळ, ऑफिसमध्ये जायची घाई, ऑटोरिक्षाची मोठी रांग, रांगेत उभे असलेले दोन परिच्याचे व्यक्तिं आपसात सहज गप्पा मारत होते.
तितक्यात ऑटोरिक्षा आमचा समोर येउन थांबली आणि जशी ऑटोरिक्षा चालायला लागली तशी रिक्षावाल्यामध्ये आणि त्या दोन व्यक्तींमध्ये गप्पा रंगत होत्या ... मी मात्र गप्पा ऐकण्यात गुंग ....
तितक्यातच दोन व्यक्तिंन पैकी ऐकणे ऑटोरिक्षावालयाला विचारलं की तुमचा मुलगा मोठा की मुलगी मोठी ????
ऑटोरिक्षावालयाने माला दोन मुली आहेत दादा असं उत्तर दिलं .... त्या उतारावर दुसरा व्यक्तिं हसून पटकन म्हणाला दोन मुली म्हणजे जास्त खर्च !!!!!!
ह्यावर त्या गरीब रिक्षावालयाने चपळाईने उत्तर दिलं की मीच जर मुली म्हणजे जास्त खर्च आहे अस बोलायला लागलो तर भारताच्या लोकांचे विचार ह्या शतकात कसे बदलतील ???????
सुरवात तर आपल्या पासूनच केली पाहिजे तेव्हाच देश बदलेल !!!!!!!!
वाहा वाहा तो ऑटोरिक्षावाला ...................
आज तुमच्या ह्या बोलण्याने मला मी मुलगी असल्याचा अभिमान आहे .....